मंगरुळपीर बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 04:43 PM2019-01-01T16:43:59+5:302019-01-01T16:44:03+5:30
अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील अडते संघटनेच्यावतीने सोमवार २१ डिसेंबरपासून शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवले होते. त्यामुळे रब्बीच्या हंगामात विविध खर्चांसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांची पंचाईत झाली होती. या संदर्भात लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर अखेर अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाºया व्यापाºयांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु महिनाभरापासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले होते. व्यापाºयांकडे वारंवार मागणी करूनही थकलेली रक्कम देण्यास व्यापाºयांकडून टाळाटाळ होत असल्याने अडते मंडळी अडचणीत सापडली होती. लिलावात विकलेल्या मालाचे चुकारे देण्यासाठी त्यांच्याकडे रक्कमच नसल्याने त्यांची पंचाईत झाली होती. त्यामुळे त्यांनी बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात बाजार समितीच्या सचिवांना पत्र देऊन सोमवार २१ डिसेंबरपासून बाजार समितीमधील व्यवहारही बंद करण्यात आले. त्यामुळे या दिवशी शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांना मालाच्या वाहतुकीचा नाहक भुर्दंड सोसावा लागला. या संदर्भात लोकमतने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा करीत बाजार समिती प्रशासनाचे आणि पदाधिकाºयांचे लक्ष वेधत शेतकºयांची समस्या उजागर केली. त्याची बाजार समिती प्रशासनाने त्याची दखल घेत अडते आणि व्यापाºयादरम्यानचा चुकाºयावरून असलेला वाद सोमवारी मिटविला आणि मंगळवार १ जानेवारी २०१९ पासून येथील खरेदीविक्र ीचे व्यवहार पूर्ववत करण्यात आले.