मंगरूळपीरच्या युवकाने ‘पेन्सिल’वर साकारली गणरायांची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:49 PM2018-07-22T13:49:55+5:302018-07-22T13:52:30+5:30

मंगरूळपीर : शहरातील एका अभियांत्रिकीमध्ये पदवीप्राप्त युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, गणरायांची प्रतिकृती साकारली आहे.

Mangarulipir's youth creat 'Ganaraya' on the pencil | मंगरूळपीरच्या युवकाने ‘पेन्सिल’वर साकारली गणरायांची प्रतिकृती

मंगरूळपीरच्या युवकाने ‘पेन्सिल’वर साकारली गणरायांची प्रतिकृती

googlenewsNext
ठळक मुद्देमोहन झंझाड या युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायकांची प्रतिकृती बनविली.अभियांत्रिकीचे शिक्षण मोहनने पुर्ण केले असून काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याच्यामध्ये लहानपणापासूनच आहे.आठ पेन्सिलच्या टोकांवर आठ गणपतीची प्रतिकृती बनवून त्याने त्याच्यातील कलागुण प्रकट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहरातील एका अभियांत्रिकीमध्ये पदवीप्राप्त युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, गणरायांची प्रतिकृती साकारली आहे.  त्याच्या या उपक्रमाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळील कॉलनीमध्ये राहणाऱ्या मोहन झंझाड या युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायकांची प्रतिकृती बनविली. तब्बल आठ पेन्सिलच्या टोकांवर आठ गणपतीची प्रतिकृती बनवून त्याने त्याच्यातील कलागुण प्रकट केले. विशेष म्हणजे ही कला त्याला कोणीही शिकविली नसून त्याने आपल्या अंगी असलेल्या गुणात्मक कलेतून हे शक्य केले आहे. या कलेला ‘मायक्रो आर्ट’ असेही म्हणतात. विशेष म्हणजे जेमतेम परिस्थितीतून अभियांत्रिकीचे शिक्षण मोहनने पुर्ण केले असून काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्याच्यामध्ये लहानपणापासूनच आहे. त्याने अष्टविनायक, छत्रपती शिवाजी महाराज, शिव राजमुद्रा, ताजमहल, भारतीय चलनाची प्रतिकृती अशा अनेक प्रतिकृती मोहनने पेन्सिलच्या टोकांवर बनविल्या आहेत. अत्यंत सूक्ष्म व नाजूक असलेले पेन्सिलचे टोक साधारण व्यक्तीला हाताळताना तुटण्याची भीती असते. मात्र याच पेन्सिलच्या टोकांवर मोहनने आपली कला प्रगट करून दाखवली. मोहनच्या कलेला बघण्यासाठी अनेक मान्यवरांनी त्याच्या घरी जाऊन भेट दिल्या आणि त्याच्या या कलेचे कौतूक केले.

Web Title: Mangarulipir's youth creat 'Ganaraya' on the pencil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.