मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 02:43 PM2019-08-11T14:43:22+5:302019-08-11T14:43:31+5:30

वृक्षरोपे योग्यरित्या ठेवून, ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीत वेगळेच चित्र दिसत आहे.

 Mangarulpir Panchayat Samiti; Tree planting seedlings kept a side | मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत

मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : एकिकडे शासन पर्यावरणासाठी कोट्यवधी वृक्षांच्या लागवडीचा कार्यक्रम राबवित असताना मंगरुळपीर येथील पंचायत समितीत मात्र, या अभियानाला हरताळ फासण्याचा प्रकार होत असल्याचे दिसत आहे. वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आलेली रोपे अडगळीत टाकली असून, यातील अनेक रोपे आता सुकल्याने निकामी झाली आहेत, लोकमतने या संदर्भात शनिवारी राबविलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उघड झाली.
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ४० लाख ३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक वृक्ष रोपांची उपलब्धताही करण्यात आली आहे. विविध प्रशासकीय विभागांकडून या वृक्षरोपांची लागवड केली काय किंवा लागवडीला वेळ असेल, तर ती व्यवस्थित ठेवली आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी लोकमतच्यावतीने स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यात मंगरुळपीर येथील पंचायत समितीच्या वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आलेली रोपे कचºयासारखी अडगळीत टाकल्याचे आणि त्यातील बहुतांश वृक्षरोपे सुकल्याने निकामी झाल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाने मंगरुळपीर पंचायत समितीला वृक्ष लागवडीसाठी स्वतंत्र उद्दिष्ट ठरवून दिले असून, या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी पंचायत समितीत वृक्षरोपे उपलब्धही करण्यात आली आहेत. त्यामुळे उपलब्ध झालेल्या वृक्षरोपांची लागवड होणे अपेक्षीत आहे. त्यात उपलब्ध वृक्षरोपांच्या लागवडीला वेळ असेल, तर ती वृक्षरोपे योग्यरित्या ठेवून, ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीत वेगळेच चित्र दिसत आहे. या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रोपांपैकी जवळपास शंभर रोपे पंचायत समितीच्या आवारात फेकून दिल्या गत टाक ण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीच अपव्यय होत असल्याचे दिसते.


पंचायत समितीच्या आवारात ठेवलेली वृक्षरोपे लागवडीसाठी आहेत. आता दोन दिवस सुटी असल्यामुळे एखाद्या कर्मचाºयाला सांगून ही रोपे व्यवस्थित करण्यासह रोपांना पाणी टाकण्याच्या सुचना तातडीने देऊ.
-ज्ञानेश्वर टाकरस
गटविकास अधिकारी,
पंचायत समिती मंगरुळपीर

Web Title:  Mangarulpir Panchayat Samiti; Tree planting seedlings kept a side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.