लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 08:38 PM2018-04-12T20:38:37+5:302018-04-12T20:38:37+5:30

वाशिम - सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणाºया मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक्ष लाच स्विकारणाºया खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले. उपसभापती सुभाष शंकरराव शिंदे व दिलीप महादेव अवगण अशी आरोपींची नावे आहेत.

Mangrilpir Panchayat Samiti's deputy president arrest in bribe case! | लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद!

लाचप्रकरणी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती जेरबंद!

Next
ठळक मुद्देविहिरीच्या कार्यारंभ आदेशासाठी मागितली लाच खासगी इसमही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम - सहस्त्र सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश काढून देण्यासाठी लाभार्थीकडून सहा हजार रुपये लाचेची मागणी करणा-या मंगरूळपीर पंचायत समितीच्या उपसभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातून ताब्यात घेतले. प्रत्यक्ष लाच स्विकारणा-या खासगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले. उपसभापती सुभाष शंकरराव शिंदे व दिलीप महादेव अवगण अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदाराच्या भावाच्या नावाने सहस्त्र सिंचन विहिर मंजूर असून, सदर विहिरीचा कार्यारंभ (वर्क आॅर्डर) काढून देण्यासाठी मंगरूळपीर पंचायत समितीचे उपसभापती सुभाष शंकरराव शिंदे (५०) रा.गोगरी यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने १२ एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सुभाष शिंदे यांनी तडजोडीअंती सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर मंगरूळपीर पंचायत समिती परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी सुभाष शिंदे यांनी लाचेची सहा हजार रुपयाची रक्कम खासगी इसम दिलीप महादेव अवगण रा. पिंप्री अवगण यांच्याकडे देण्यास सांगितले. अवगण यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच सुभाष शिंदे व दिलीप अवगन या दोघांनाही ताब्यात घेऊन लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोºहाडे, पोलीस कर्मचारी भगवान गावंडे, नितीन टवलारकर, अरविंद राठोड, विनोद अवगळे आदींनी पार पाडली.

Web Title: Mangrilpir Panchayat Samiti's deputy president arrest in bribe case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.