मंगरुळपीर येथील व्यापाऱ्यांनी थकविले अडत्यांचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:47 PM2018-12-24T17:47:33+5:302018-12-24T17:48:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ) : गेल्या २४ दिवसांपासून व्यापाऱ्यां नी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती ...

mangrulpir market committee bills pending by businessmens | मंगरुळपीर येथील व्यापाऱ्यांनी थकविले अडत्यांचे पैसे

मंगरुळपीर येथील व्यापाऱ्यांनी थकविले अडत्यांचे पैसे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर ( वाशिम ) : गेल्या २४ दिवसांपासून व्यापाऱ्यां नी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. याबाबत बाजार समितीच्या सचिवांना पत्रही देण्यात आले असून, सोमवारी याच कारणामुळे बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.
मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु २४ दिवसांपासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले आहे. बाजारात शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांनी अडत्यांकडे शेतमाल टाकल्यानंतर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते.  या मालाचा लिलाव झाल्यानंतर अडत्याकडून शेतकºयांना एक टक्का अडतीची रक्कम कापून चुकारे करण्यात येतात, तर शेतमालाची खरेदी करणारे व्यापारी अडत्यांना सात दिवसांच्या मुदतीत शेतामालाची रक्कम देतात. यावरच बाजार समितीमधील शेतकरी, अडते आणि व्यापाºयांचे व्यवहार चालतात; परंतु मंगरुळपीर बाजार समितीअंतर्गत गेल्या २४ दिवसांत अडत्यांकडून शेतमालाची खरेदी करूनही व्यापाºयांनी त्यांचे चुकारे केले नाहीत, तर अडत्यांनी मात्र शेतकºयांच्या रकमेचे चुकारे केले आहेत. आता पुढील व्यवहारासाठी त्यांच्याकडे रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच व्यापारी चुकारे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अडते संघटनेच्यावतीने बाजार समिती सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार २४ डिसेंबर रोजी बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले. या प्रकारामुळे शेतकºयांची नाहक ससेहोलपट होत असून, रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांवर फवारणी करणे, खत देणे आदि कामांसाठी त्यांना पैशांची अडचण भासणार आहे. 

Web Title: mangrulpir market committee bills pending by businessmens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.