मंगरूळपीर : ओंकार सातपुते हत्याकांडा प्रकरण; जावयास अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:00 PM2018-02-18T21:00:32+5:302018-02-18T21:18:34+5:30
मंगरूळपीर (वाशिम) : बोरव्हा शेतशिवारातील एका खड्डयात आढळलेल्या ओंकार सातपुते या युवकाच्या मृतदेहाच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी दोन आरोपींना १८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात ओंकारचा जावई राजू रामकृष्ण मळघने याचा प्रमुख समावेश असल्याची फिर्याद मृतकाच्या पत्नीने नोंदविल्यावरून एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : बोरव्हा शेतशिवारातील एका खड्डयात आढळलेल्या ओंकार सातपुते या युवकाच्या मृतदेहाच्या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून याप्रकरणी जावई राजू रामकृष्ण मळघने यास १८ फेब्रुवारीला अटक करण्यात आली आहे. या हत्याकांडात ओंकारचा जावई राजू रामकृष्ण मळघने याचा प्रमुख समावेश असल्याची फिर्याद मृतकाच्या पत्नीने नोंदविल्यावरून एकच खळबळ उडाली आहे.
सुरेखा ओंकार सातपुते (रा.एकांबा) यांनी फिर्यादीत नमूद केले आहे, की तिचा पती ओंकार शेषराव सातपुते हा १० फेब्रुवारी रोजी पालकाची भाजी आणतो, असे सांगून शेतात गेला होता. मात्र, १० ते १७ तारखेच्या दरम्यान आरोपी राजू रामकृष्ण मळघणे (रा.पारवा) याने ओंकारला झोपेच्या गोळ्या टाकून दारू पाजली. तसेच घातपात करून त्यास ठार मारले व पुरावा नष्ट होण्याच्या उद्देशाने लुंगे यांच्या शेतशिवारातील पडक्या विहीरीतील खड्डयात पुरले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजू मळघणे यास अटक करून त्याच्याविरूद्ध कलम ३०२, २०१ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक कांबळे, पोहेकाँ अंबादास राठोड, केशवसिंह चंदेल, सुनील गंडाईन करीत आहेत.