वाशिममध्ये मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला मारले जोडे; पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याचा भाजपने केला निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:08 PM2017-12-08T17:08:10+5:302017-12-08T17:17:08+5:30
वाशिम: काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद वाशिममध्येही उमटले असून भाजप, भाजयुमो शहर, तालुका व सर्व आघाड्यांच्या वतीने अय्यर यांच्या वक्तव्याचा ८ डिसेबर रोजी स्थानिक डॉ. आंबेडकर चौकात अय्यर यांच्या प्रतिमेला जुतेमार आंदोलन करुन निषेध करण्यात आला.
वाशिम: काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद वाशिममध्येही उमटले असून भाजप, भाजयुमो शहर, तालुका व सर्व आघाड्यांच्या वतीने अय्यर यांच्या वक्तव्याचा ८ डिसेबर रोजी स्थानिक डॉ. आंबेडकर चौकात अय्यर यांच्या प्रतिमेला जुतेमार आंदोलन करुन निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे म्हणाले की, कॉग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी जाहीर भाषणामध्ये देशाचे कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करुन काँग्रेसची वृत्ती दाखविली. आजही आम्ही इंग्रजांचे अनुयायी असल्याचे चित्र मणीशंकर अय्यर यांनी निर्माण केले. तसेच अय्यर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे हेंद्रे म्हणाले. यावेळी शहर अध्यक्ष धनंजय हेंद्रे, प्रदेश चिटणीस नितेश मलीक, नमामी गंगेचे जिल्हाध्यक्ष भिमकुमार जिवनाणी, मिठुलाल शर्मा, न.प. सभापती राहुल तुपसांडे, न.प. उपाध्यक्ष बंटी वाघमारे, प्रमोद गंडागुळे, मनिष मंत्री, शहर उपाध्यक्ष निलेश जैस्वाल, भाजयुमो शहर अध्यक्ष पवन जोगदंड, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री देशमुख, शहर अध्यक्षा कल्पना खामकर, नगरसेवीका करुणाताई कल्ले, संतोष वानखेडे, वसिम भवानीवाले, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष जीवन अग्रवाल, उमेश मुंंदडा, कपिल सारडा, गणेश खंडाळकर, आशुतोष राऊत, रामा इंगोले, धनाजी सारसकर, शिवा गाडेकर, सुरेश चौधरी, साखरकर, कैलास मुंगनकर, रोहीत चांदवाणी, नितेश राठी, शुभम घुगे, गणेश जगताप, सचिन शर्मा, पवन कणखर, संतोष चौधरी, प्रविण लांडे, उषा वानखडे, वच्छला जाधव, इंदिरा बरेटीया, लिना रोठे, रेखा बरेटीया, दिपक राऊत, राहुल शिंदे, महंमद बिलाल, फिरोज मांजरे, रियाजखान, महंमद अजहर, मोईनखान, काजी जुनेद, शेख नदीम आदी भाजपा व इतर आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.