मानोरा शतप्रतिशत बंद!
By admin | Published: June 2, 2014 01:03 AM2014-06-02T01:03:31+5:302014-06-02T01:10:27+5:30
वाशिम जिल्ह्यात थोरपुरूषांच्या विटंबनेच्या घटनेचे लोण: शिवसेनेने दिले जिल्हाधिकार्यांना निवेदन.
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकणे तथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या विटंबनेमुळे राज्यभरात निर्माण झालेले तणावाचे लोण आज वाशिम जिल्ह्यातही पसरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. सुधिर कव्हर यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना भेटुन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तर शिवसेनेच्या तालुका पदाधिकारी पुकारलेल्या मानोरा बंदला शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. पूण्यातील एका समाजकंटकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकर अपलोट केल्या होत्या. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचेही विटंबना करण्यात आली होती. आज जिल्हाभर या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेने जिल्हाप्रमुख सुधिर कव्हर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, शहरप्रमुख गजानन भादुंर्गे आदींची शिष्टमंडळात उपस्थिती होती. मानोरा तालुक्यात शिवसेनेच्या तालुका पदाधिकार्यांनी शहर बंद पुकारला होता. मानोरा बंद आंदोलनात शिवसेनेसह संभाजी ब्रिगेड, बजरंग दल, विश्वहिंदु परिषद, साईबाबा व्यायाम शाळा, शिवराज मित्रमंडळ, विरभजन सिंग मित्रमंडळ, रुद्राफायटर फिट क्लब, बंजारा क्रांतीदल आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. पोलीसांनी कडेकोट तैनात ठेवला होता