मानोरा शहरात शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 04:16 PM2020-07-13T16:16:34+5:302020-07-13T16:16:39+5:30

मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता.

In Manora, farmers rally of bullock cart | मानोरा शहरात शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा

मानोरा शहरात शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा  : शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी प्रति हेकटर पंचविस हजार रुपये मदत करण्यात यावी या प्रमुख मागणीसाह मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता. तहसील परिसरात सर्वत्र बैलबंडी व शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली दिसून आलीत्र                                                            
कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  पहिल्या जोरदार पावसाच्या काळात केलेल्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली. कोरोनातील लॉकडाउन संकटामुळे शेतकऱ्यांच्या, अल्पभूधारक शेतकरी मजुरांच्या हाताला काम नाही. आस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटाना शेतकरी सामोरे जात आहे.आधीच आत्महत्या ग्रस्त जिल्हा व त्यात हे महाभयंकर संकटामुळे कात्रीत सापडलेल्या शेतकº्यांना वेळीच मदत देण्याच्या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात आले होते.
परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात सोमवार,  दिनांक १३ जुलै २०२० ला  सदर मोर्चा प्रमुख मार्गदर्शक  उद्योजक संजय महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष जाधव  तांडा सुधार समितीचे नामा बंजारा, समाज प्रभोधनकार पंकजपाल महाराज  अ‍ॅड.बाळा चव्हाण आदिंच्या उपस्थितीत काढण्यात आला.  
शेतकºयांच्या बैलबंडी मोर्चामुळे तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू  नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त     ठेवण्यात आला होता.


-मोर्चात विविध संघटनांचा सहभाग
 या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय विमुक्त, घुमन्तु जनजाती वेलफेअर संघ, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, बंजारा क्रांतिदल महाराष्ट्र प्रदेश, परिवर्तन फाउंडेशन, शिवसंग्राम संघटना, कर्मचारी आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, धनगर समाज संघटना, वसंतराव नाईक मित्र मंडळ व अनेक शेतकºयांनी सहभाग घेतला होता. मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहचल्यानंतर तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
-
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोर्चाचे आयोजन
 भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे शासनाचे सतत दुर्लक्षच होत राहिले आहे.अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास शेतकरी दुबार पेरणी करू शकणार नाही त्यामुळे त्याच जीवनच गणितच बिघडून जाईल व शेवटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे यामोचार्चे आयोजन करण्यात आल्याचे मनोहर राठोड या शेतकरी नेते यांनी  कळविले आहे.


शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष
शेतकºयांना त्वरित मदत देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकºयांनी शासनाविरुध्द रोष व्यक्त करीत प्रशासनाने शेतकºयांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी केली. यावेळी संतप्त असलेल्या शेतकºयांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होवू शक ले नसले तरी सर्वांनी तोंडाला मास्क लावून आंदोलनात सहभाग नोंदविला होता. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकºयांच्या मागण्यांची त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली.

Web Title: In Manora, farmers rally of bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.