मानोरा बाजार समिती सभापती पदासाठी मोर्चेबांधणी; १६ फेब्रुवारीला निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:00 PM2018-02-02T17:00:46+5:302018-02-02T17:02:49+5:30
मानोरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार असल्याचे इच्छुकांची र्मोचे बांधणीस सुरुवात झाली आहे.
मानोरा - कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणुक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभागृहात ११ वाजता पार पडणार असल्याचे इच्छुकांची र्मोचे बांधणीस सुरुवात झाली आहे.
मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोठे यांचा सभापती पदाचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर २०१७ ला पूर्ण झाला होता. तथापि, तब्बल चार महिन्यानंतर २४ जानेवारीला डॉ.रोठे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक वाशिम यांनी २५ जानेवारीला पत्र पाठवून तालुका सहाय्यक निबधंक गुल्हाने यांना अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्त केले असून, आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मानोरा बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक १६ फेबु्रवारीला बाजार समितीच्या सभापगृहात पार पडणार आहे. यावेळी दुपारी १२ वाजतापर्यंत उपस्थित संचालकांच्या स्वाक्षºया घेणे, नामनिर्देशन पत्र देणे व स्विकारणे, तसेच १२ ते १ वाजतापर्यंत अर्जांची छाननी, १.१५ वाजता उमेदवारी जाहीर करणे, त्यानंतर १.३० वाजता आवश्यक असल्यास मतदान आणि मतदानानंतर ३ वाजता निकाल लगेच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे सभापती पदासाठी इच्छूक संचालकांनी आपल्या नेत्याकडे मोर्चे बांधणी सुरू केली असून, बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी उर्वरीत कालावधीसाठी सभापती पदाचा बहुमान कोण्या संचालकाला मिळतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.