पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मानोरा पोलिसांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:04 PM2019-03-19T18:04:35+5:302019-03-19T18:04:56+5:30
मानोरा (वाशिम) : उन्हाचा पारा वाढत असताना माणसांप्रमाणेच पशूपक्ष्यांचा जीव तहानेने कासाविस होत आहे. या जिवांची तहान भागविण्यासाठी मानोरा पोलिसांनी पुढाकार घेतला असून, पोलीस स्टेशन परिसरात त्यांच्यावतीने प्लास्टिक निर्मित पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : उन्हाचा पारा वाढत असताना माणसांप्रमाणेच पशूपक्ष्यांचा जीव तहानेने कासाविस होत आहे. या जिवांची तहान भागविण्यासाठी मानोरापोलिसांनी पुढाकार घेतला असून, पोलीस स्टेशन परिसरात त्यांच्यावतीने प्लास्टिक निर्मित पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. उन्हाळाभर त्यात पाणी टाकून हजारो पशूपक्ष्यांची तहान भागविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून, तहानेमुळे माणसाचा जीव कासावीस होत आहे. हीच स्थिती पशूपक्ष्यांचीही आहे; परंतु पशूपक्ष्यांना तहान भागविण्यासाठी पुरेसी व्यवस्था शहरी भाग किंवा लोकवस्तीत नाही. शेकडो गुरे तहान भागविण्यासाठी सैरभैर फिरताना दिसत आहे. पक्षीही थेंबभर पाण्यासाठी सैरभैर उडत असल्याचे दिसत असून, पाण्याअभावी गुरांचा आणि पक्ष्यांचा जीव धोक्यात येत आहे. आता एरव्ही कायदा-सुव्यवस्थेसाठी कठोर भूमिका घेणाºया पोलीसदादांनी पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मानोरा पोलिसांनी ठाणेदार धु्रवास बावणकर यांच्या मार्गदर्शनात पशूपक्ष्यांची तहान भागविण्यासाठी प्लास्टिक निर्मित टाक्या खरेदी करून त्या पोलीस स्टेशनलगत ठेवल्या आहेत. या टाक्यांत दैनंदिन पाणी भरून गुराढोरांसह पक्ष्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. त्यामुळे शहरात पाण्यासाठी भटकणाºया गाई, म्हशी, शेळ्या, कुत्रे यांच्यासह पाण्यासाठी इकडून तिकडे उडत राहणाºया पक्ष्यांनाही मोठा आधार होणार आहे. हा उपक्रम उन्हाभर राबविण्याचा निर्धार मानोरा पोलिसांनी केला आहे.