मानोरा सरपंच, उपसरपंच निवडणूक शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:42 AM2021-02-16T04:42:20+5:302021-02-16T04:42:20+5:30
तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १५ फेब्रुवारीला निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तालुक्यातील मानोरा ...
तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १५ फेब्रुवारीला निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तालुक्यातील मानोरा : धामनी (मानोरा) सरपंचपदी दीपा अभिजीत पाटील विजयी झाले, तर उपसरपंचपदी सतीश श्रीराम सोनोने अविरोध झाले, शेंदुरजना (अढाव) सरपंच पदी पूजा गणेश काळे विजयी झाल्या, तर उपसरपंचपदावर जगदीश खंडूसिंग राठोड अविरोध झाले, वरोली सरपंचपदी बेबी विलास आवारे विजय झाल्या, तर उपसरपंचपदी विद्या संतोष गावंडे अविरोध झाले, गव्हा सरपंचपदी राहुल लक्ष्मण भगत, उपसरपंच पुष्पाबाई कुराडे, हळदा सरपंचपदी पानाबाई प्रल्हाद राठोड, उपसरपंचपदी रंजना लालसिंग राठोड, सेवादासनगर सरपंचपदी वंदना नेमिचंद राठोड, उपसरपंचपदी लीलाबाई पंडित चव्हाण, तळप बु. सरपंचपदी सुनीता देवानंद साखरकर, तर उपसरपंचपदी कल्पना अनिल इंगोले, हिवरा बु. सरपंचपदी शालू विजय वाघमारे, तर उपसरपंचपदी रूपेश गोविंदराव म्हातारमारे, आसोला बु. सरपंचपदी धनंजय रामराव इंगोले, तर उपसरपंचपदी सरिता पुरुषोत्तम इंगोले यांची निवड झाली.