मानोरा तालुक्यात किटकनाशकांच्या फवारणीतून दोन शेतमजुरांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 03:37 PM2018-08-29T15:37:51+5:302018-08-29T15:41:06+5:30

इंझोरी (जि. वाशिम) : पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतमजुरांना विषबाधा झाल्याची घटना इंझोरी येथे सोमवारी सायंकाळी घडली.

 In Manora taluka; Poisoning of two farm laborers by spraying pesticides | मानोरा तालुक्यात किटकनाशकांच्या फवारणीतून दोन शेतमजुरांना विषबाधा

मानोरा तालुक्यात किटकनाशकांच्या फवारणीतून दोन शेतमजुरांना विषबाधा

googlenewsNext
ठळक मुद्देदामू एकनाथ लांडगे (२२) आणि ललित एकनाथ लांडे (२४) अशी त्यांची नावे असून, हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (जि. वाशिम) : पिकांवर किटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतमजुरांना विषबाधा झाल्याची घटना इंझोरी येथे सोमवारी सायंकाळी घडली. त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दामू एकनाथ लांडगे (२२) आणि ललित एकनाथ लांडे (२४) अशी त्यांची नावे असून, हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. दामू लांडगे याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
दामू लांडगे आणि ललित लांडगे हे दोघे भाऊ पिकांवर किटकनाशक फवारणीचे काम करतात. इंझोरी शिवारातील एका शेतात सोमवारी ते कपाशी पिकावर फवारणी करीत असताना दोघांनाही मळमळ होऊन ओकारी सुरू झाल्या. त्यांनी घरच्यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता किटकनाशकाचे अधिक प्रमाण दामू लांडगे यांच्या रक्तात मिसळल्याचे आढळले. त्यातच त्याचा आवाजही बंद झाला. त्यामुळे त्याला मंगळवारी अकोला येथे हलविण्यात आले, तर ललितला बुधवार २९ आॅगस्ट रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तथापि, तो अद्यापही अस्वस्थ असून, पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी गेला आहे.

Web Title:  In Manora taluka; Poisoning of two farm laborers by spraying pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.