गतवर्षीच्या तुलनेत यंदा मानोरा तालुक्याचा निकाल घसरला!

By admin | Published: May 31, 2017 02:05 AM2017-05-31T02:05:05+5:302017-05-31T02:05:05+5:30

मानोरा : तालुक्याचा निकाल ८४.६७ टक्के एवढा लागला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ४.९७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

Manora taluka resulted in this year's decline! | गतवर्षीच्या तुलनेत यंदा मानोरा तालुक्याचा निकाल घसरला!

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मानोरा तालुक्याचा निकाल घसरला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३० मे रोजी आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात तालुक्याचा निकाल ८४.६७ टक्के एवढा लागला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ४.९७ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
१९७८ विद्यार्थ्यांनी परिक्षा आवेदन पत्र भरले होते १९७७ विद्यार्थी परिक्षेला बसले पैकी १६७४ विद्यार्थी पास झाले. शाळानिहाय निकालानुसार आप्पास्वामी ज्यु कॉलेज शेंदूरजना अढाव ८६.०९ टक्के सुभद्राबाई पाटील ज्यु कॉलेज मानोरा ९१.८५ किसनराव ज्यू. कॉलेज पोहरादेवी ७०.४२ टक्के, एलएसपीएम ज्यु कॉलेज मानोरा ९६.८७ टक्के, के.एल.देशमुख ज्यु कॉलेज कारखेडा ८९.८५ टक्के, श्री मुंगसाजी महाराज ज्यू. कॉलेज इंझोरी ८९.८३ टक्के, राष्ट्रमाता इंदिरा गांधी ज्यु कॉलेज मानोरा ८८.५७ टक्के, वसंतराव नाईक विद्यालय व गजानन महाराज ज्यू. कॉलेज भोयणी ७७.७७ टक्के, जय बजरंग विद्यालय व वसरामजी नाईक ज्यू. कॉलेज भुली ६३.१५ टक्के, वसंतराव नाईक ज्यू. कॉलेज पाळोदी ६३.८२ टक्के, श्री भगवंतराव ज्यू. कॉलेज गिरोली ८५.७१ टक्के, सुलेमानिया उर्दू ज्यू. कॉलेज मानोरा ९० टक्के, श्री बाबनाजी महाराज ज्यू. कॉलेज कोंडोली ७९.३१ टक्के, जगदगुुरु संत सेवालाल महाराज ज्यु.कॉलेज पोहरादेवी ८५.७१ टक्के, प्रशिक ज्यु. कॉलेज धावंडा ७५.४३ टक्के, वाघामायदेवी आदिवासी ज्यु. कॉलेज रुई गोस्ता ७८.०२ टक्के, श्री सोहंमानाथ ज्यू. कॉलेज आसोला खुर्द ९०.७४ टक्के, काशिबाई राठोड ज्यु.कॉलेज सोयजना ७८.९३ टक्के, वसंतराव नाईक आश्रम शाळा फुलउमरी ८२.२६ टक्के, असा शाळानिहाय निकाल आहे. सर्वात अधिक निकाल रहेमानीया उर्दु ज्यू. कॉलेज मानोराचा आहे; तर सर्वात कमी निकाल वसंतराव नाईक ज्यू. कॉलेज, पाळोदीचा आहे.

Web Title: Manora taluka resulted in this year's decline!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.