मानोरा कोरोनामुक्तीच्या वाटेवर; दहा दिवसांत केवळ दोन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:33+5:302021-06-30T04:26:33+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लाट आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून, कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. गत ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लाट आता पूर्णपणे नियंत्रणात आली असून, कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले आहे. गत आठवडाभरात जिल्ह्यात केवळ १०९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात मानोरा तालुक्यात १० दिवसांत केवळ दोन कोरोनाबाधित आढळून आले असून, गत पाच दिवसांत या तालुक्यात एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यातच पूर्वी आढळलेल्या बाधितांची प्रकृती आता स्वस्थ असून, आरोग्य विभाग व प्रशासनाच्या व्यापक उपाय योजनांमुळे हा तालुका आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर आला आहे.
-----------------
बॉक्स: जामदरा, इंझोरीत ग्रामपंचायतची दक्षता
मानोरा तालुक्यात गत दहा दिवसांत केवळ दोन व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. या व्यक्ती इंझोरी आणि जामदरा घोटी येथील आहेत. शुक्रवार २५ जून रोजी त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. दोन्ही गावे कोरोनामुक्त झाल्यानंतर नवे बाधित आढळून आल्याने गावे कोरोनामुक्त करण्याच्या ग्रामपंचायतींच्या प्रयत्नांना तडा गेला. आता या दोन्ही ग्रामपंचायती पूर्वीपेक्षा अधिक दक्षता बाळगत आहेत.
------------------------
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
- एकूण बाधित -४१३९७
-अॅक्टिव्ह -२०९
-डिस्चार्ज -४०५६८
-मृत्यू -६१९