मूर्तिजापूर रस्त्यावर गॅस टँकर उलटला !

By admin | Published: May 13, 2017 04:53 AM2017-05-13T04:53:01+5:302017-05-13T04:53:01+5:30

दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प : पोलिसांची घटनास्थळ हजेरी, दुस-या मार्गाने वाहतूक वळती

Mantijapur road gas tanker overturned! | मूर्तिजापूर रस्त्यावर गॅस टँकर उलटला !

मूर्तिजापूर रस्त्यावर गॅस टँकर उलटला !

Next

कारंजा : कारंजा ते मूर्तिजापूर रस्त्यावरील खेर्डा बुद्रूक गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर गॅस टँकर उलटल्याची घटना १२ मे रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घटना घडली़ या घटनेनंतर काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ मात्र, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविल्याने वाहनधारकांची गैरसोय टळली़
मुंबई येथून नागपूरकडे गॅस घेऊन जाणारा एमएच एच-४२९६ क्रमांकाचा टँकर शुक्रवारी इंडिका कारला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उलटा झाला़ यामध्ये चालक प्यारेसिंग देवळे मोठेखेड रा़ धारणी जि. अमरावती हा जखमी झाला, तसेच अपघातामुळे टाकीला छिद्र्र पडल्याने गॅस गळतीला सुरुवात झाली़ स्फोट होण्याचा संभावित धोका लक्षात घेता दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी खेर्डा बुद्रूक चौफुली येथून पुढे वाहतूक बंद केली व खानापूर तथा काजळेश्वर या मार्गे वाहतूक वळवली़ तसेच धनज खुर्द येथील गॅस बॉटलिंग प्लांट येथे संपर्क करण्यात येऊन तेथून खाली गॅस टँकर मागविण्यात आला व पलटी झालेल्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला़ सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती़ खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते़

Web Title: Mantijapur road gas tanker overturned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.