बाहेरगावी जाण्याकरिता कुटुंबातील अनेकांना पाडले आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:43+5:302021-06-09T04:50:43+5:30
अतिआवश्यक कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पाेलीस विभागाकडून ई पास देण्यात येत हाेता. यामध्ये शेकडाे लाेकांनी आपल्याला दवाखान्याचे काम आहे, घरी ...
अतिआवश्यक कामासाठी बाहेरगावी जाण्यासाठी पाेलीस विभागाकडून ई पास देण्यात येत हाेता. यामध्ये शेकडाे लाेकांनी आपल्याला दवाखान्याचे काम आहे, घरी वडील आजारी आहेत अशी कारणे सांगून ई पाससाठी अर्ज केले हाेते. परंतु पाेलीस विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणी व अर्जासाेबत आवश्यक असलेली कागदपत्रे न जाेडल्याने अशा व्यक्त्तिंचे ई पास रद्द करण्यात आले. ज्यांना खराेखरच अत्यावश्यक कामे हाेती त्यांनी त्रुटींची पूर्तता करुन पुन्हा अर्ज केलेत, त्यांना ई पास पाेलीस विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आले. ई पास द्वारे जिल्ह्यासह परजिल्ह्यात अनेकांनी प्रवास केला.
....................
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारणे
वडिलांची प्रकृती ठिक नाही, त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावे लागते.
पत्नीची डिलिव्हरी असून तिला माहेरी घेऊन जायचे आहे.
आई वडिलांना काेराेना झाला आहे, त्यांना पाहण्यासाठी जायचे आहे.
नजिकच्या नातेवाईकांचे लग्नाचे कारण
कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे, वडिलांना शुगर, बीपीचा त्रास असल्याचे कारण
अनेक दिवसांपासून गावाकडे गेलाे नसल्याचे कारण
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारणे
...............
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी
वाशिम जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाण्यासाठी करण्यात आलेल्या ई पाससाठी बहुतांश नागरिकांचे कारण मेडिकल इमर्जन्सी दाखविण्यात आले. यामध्ये कुटुंबातील व्यक्तिंना आजार दाखविणे इ. कारणे आहेत. परंतु पाेलीस विभागाकडून कागदपत्रे मागितल्यानंतर ते देण्यात आले नाहीत.
.............
परजिल्ह्यातील नागरिकांना गावाकडे जायचे आहे, काही दवाखान्याचे काम आहे यासह अत्यावश्यक कामासाठी जायचे असल्यास ई पास देण्याचे नियाेजन हाेते. शहानिशा केल्यानंतर नागरिकांना ई पास देण्यात आला.
- वसंत परदेसी, पाेलीस अधीक्षक, वाशिम