काेराेनावर मात केल्यानंतर अनेकांची रुग्णालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:27+5:302021-07-17T04:30:27+5:30

वाशिम : काेराेनावर मात केल्यानंतर अनेकांना श्वसनाचा, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास हाेत आहे. ज्या रुग्णांना हा त्रास हाेत आहे, ...

Many rushed to the hospital after overcoming Kareena | काेराेनावर मात केल्यानंतर अनेकांची रुग्णालयात धाव

काेराेनावर मात केल्यानंतर अनेकांची रुग्णालयात धाव

Next

वाशिम : काेराेनावर मात केल्यानंतर अनेकांना श्वसनाचा, पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास हाेत आहे. ज्या रुग्णांना हा त्रास हाेत आहे, ते रुग्णालयात धाव घेऊन उपचार करताना दिसून येत आहेत. यामध्ये सर्वाधिक गट हा ५० वर्षांवरील असल्याचे दिसून येत आहे.

काेराेनानंतर प्रतिकारशक्ती काही दिवसांपुरती कमी हाेत असल्याने थकवा येणे, श्वसनाचा त्रास हाेतच असला, तरी नागरिक घाबरून दवाखान्यात धाव घेत असल्याचे चित्र जिह्यातील रुग्णालयात दिसून येत आहे. श्वसनाचा त्रास असलेले काही रुग्ण रुग्णालयात भरतीही हाेत असून, एक किंवा दाेन दिवसांतच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे. काेराेनानंतर काेणताही त्रास हाेत असल्यास ताे अंगावर न काढता व घाबरून न जाता, आराेग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आराेग्य विभागातर्फे करण्यात येत आहे, तसेच जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर असून, दरराेज रुग्णसंख्येत माेठ्या प्रमाणात घट हाेत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

-----------

पाेस्ट काेविडचा सर्वाधिक धाेका ज्येष्ठांना

पाेस्ट काेविडचा सर्वाधिक धाेका ज्येष्ठांना असून कंबर दुखणे, शाैचास बसण्यास त्रास होणे, मांडी घालणे त्रासदायक ठरणे, पायऱ्या चढताना त्रास होणे अशी लक्षणेही आढळून येत आहेत. अशी लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

----

काेराेनातून बरा, पण श्वसनाचा त्रास

काेराेनातून बरे झाल्यानंतर अनेक जणांना श्वसनाचा त्रास हाेत असून, थाेडे जरी चालले, तर थकवा जाणवत आहे.

काही जणांचे हातपाय दुखत असल्याचे काेराेनातून बरे झालेले सांगत आहेत.

काहींना फुप्फुसाचा त्रास.

------

बरे झाल्यानंतरही घ्या काळजी

श्वास लागत असल्यास झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. डोकं आणि मानेला आधारासाठी डोक्याखाली उशी घ्यावी. पाय गुडघ्यातून थोडे दुमडून घ्यावेत.

खुर्चीवर बसल्यावर त्रास झाल्यास, थोडं पुढे वाकावं आणि हात मांड्यांवर ठेवावेत.

-----

कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास जाणवत आहे, परंतु याला घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. हा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही जणांना पायामध्ये, हातामध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होणे, अशी लक्षणे आढळून येतात. याला घाबरून जाण्याचे काही कारण नाही.

-डाॅ.मधुकर राठाेड, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम.

Web Title: Many rushed to the hospital after overcoming Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.