मोतिबिंदूच्या ४८ रूग्णांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:42 PM2017-07-29T13:42:13+5:302017-07-29T13:42:24+5:30
वाशिम : श्री सत्य साई सेवा संघटनेने एक हजार दृष्टी दान करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. सदर उद्दिष्ट समोर ठेवून तालुक्यातील कोंडाळा झामरे, तोंडगाव व सोनखास येथील रूग्णांची गुरुवारी तपासणी केल्यानंतर ४८ रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठटी निवड करण्यात आली आहे.
दृष्टी दान संकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी साई युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजू देशमुख , साई सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश गोरे यांच्या नेतृत्वात तोंडगाव, कोंडाळा झामरे व सोनखास येथे नेत्र तपासणी शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये ५०० रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये १४८ रूग्णांना मोतिबिंदू आढळून आला. यापैकी ४८ रूग्णांनी शस्त्रक्रियेसाठी तयारी दर्शविली. या रूग्णांची अकोला येथील खासगी रूग्णांलयात मोफत शस्त्रक्रिया पार पडणार आहे. या शस्त्रक्रिया दहा-दहाच्या टप्याने होणार असल्याची माहिती डॉ. राजू देशमुख व डॉ. गोरे यांनी दिली.