Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:17 PM2018-07-25T14:17:19+5:302018-07-25T14:18:27+5:30

वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन ता. रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

Maratha Kranti Morcha: Movement on tower at Govardhan |  Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन

 Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन

ठळक मुद्दे गोवर्धन येथे युवकांनी एका कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या युवकाने जलसमाधी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने विविध टप्प्यात विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन ता. रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्याऊपरही शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली. वाशिम जिल्ह्यात गोवर्धन येथे युवकांनी एका कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

Web Title: Maratha Kranti Morcha: Movement on tower at Govardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.