Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:17 PM2018-07-25T13:17:56+5:302018-07-25T13:19:44+5:30

सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने  २५ जुलै रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन, बंद,  मोर्चा काढण्यात आला.

Maratha Kranti Morcha: Movement in Washim district the next day | Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन

Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन

Next
ठळक मुद्दे २५ जुलै रोजी कारंजा येथे बंद पुकारण्यात आला.सकाळी ११ वाजता कारंजा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. केनवड, चांडस येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह औरंगाबाद  जिल्ह्यात मराठा समाजाच्या युवकाने जलसमाधी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेच्या पृष्ठभूमीवर सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने  २५ जुलै रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन, बंद,  मोर्चा काढण्यात आला. कारंजा येथे बंदला व्यापक प्रतिसाद लाभला. 
मराठा आरक्षणासाठी कानडगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्याऊपरही शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी राज्यभरात बंदची हाक दिली. वाशिम जिल्ह्यातही २४ जुलै रोजी बंद पुकारला होता. दुसºया दिवशी अर्थात २५ जुलै रोजी कारंजा येथे बंद पुकारण्यात आला.सकाळी ११ वाजता कारंजा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. व्यापाºयांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले. जलसमाधी घेणाºया काकासाहेब शिंदे यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. मालेगाव तालुक्यातील केनवड, चांडस येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  त्यामुळे नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गावरील वाहतूक जवळपास पाऊन तास ठप्प होती. सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने शिरपूरचे पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांना निवेदन दिले.

Web Title: Maratha Kranti Morcha: Movement in Washim district the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.