Maratha Reservation: रिसोड - मालेगाव मार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:36 PM2018-08-10T13:36:22+5:302018-08-10T13:40:16+5:30
रिसोड:तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे रिसोड - मालेगाव मार्गावरील पूर्ण वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले .
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मराठा समाजबांधवांच्या आंदोलनाची धग कायम असून ९ आॅगस्ट रोजी कडकडीत बंद पाळल्यानंतर १० आॅगस्ट रोजी सकाळी रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर समाजबांधवांनी तब्बल साडेतीन तास रास्ता रोको केला. यावेळी आंदोलकांनी टायर जाळून जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा सह विविध घोषणा दिल्यात. या आंदोलनामध्ये गावातील सर्व सकल मराठा समाज बांधवांसह ईतरही समाजातील नागरिकांनी पुढाकार घेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. रास्ता रोको मुळे वाहनांच्या मोठया प्रमाणात रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार या घडू न देता अतिशय शिस्तबध्द व शांततेत सकल मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको केला.