Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्यावर रास्ता रोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:19 PM2018-07-31T12:19:31+5:302018-07-31T12:25:24+5:30

मंगळवारी मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथे आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन करून तथा रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. 

Maratha Reservation: agitation in Washim district | Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्यावर रास्ता रोको 

Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील कुकसा फाट्यावर रास्ता रोको 

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका केली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे. मंगळवारी मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथे आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन करून तथा रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला. 
वाशिम- मेहकर मार्गावर मंगळवारी सकाळपासून आंदोलन सुरू केल्याने महामार्गावरिल वाहतुक बराच वेळ ठप्प झाली होती. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले व नंतर त्यांची सुटका केली. आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.

Web Title: Maratha Reservation: agitation in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.