Maratha Reservation Protest : वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे टायर जाळले, महामार्गावरील वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 01:36 PM2018-08-02T13:36:41+5:302018-08-02T13:50:37+5:30
आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या.
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथील मालेगाव रोडवर मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी (2 ऑगस्ट) रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून शासनाच्या धोरणांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. यावेळी महामार्गावरील वाहतूक दोन ते अडीच तास ठप्प झाली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. दरम्यान, यापुढेही क्रांतीदिनापर्यंत आंदोलने अधिक तीव्र करण्याचा निर्धार बुधवार, १ ऑगस्ट रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार, गुरूवारी रिसोड येथे रास्ता रोको करण्यात आला. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.