Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यात कुकसा फाटा येथे रास्ता-रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:26 PM2018-07-29T16:26:14+5:302018-07-29T17:34:46+5:30

मालेगाव : नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावरील कुकसा फाटा येथे रविवारी सकाळी ९.३० ते १ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Maratha Reservation: Route-stop at Kukasa Phata in Washim district! | Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यात कुकसा फाटा येथे रास्ता-रोको

Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यात कुकसा फाटा येथे रास्ता-रोको

googlenewsNext
ठळक मुद्दे साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मेहकर ते मालेगाव या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. कुकसा, मांगूळझनक परिसरातील १० ते १५ गावातील सकल मराठा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी  १ वाजतादरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांतर्फे वाशिम जिल्ह्यात पुकारलेल्या आंदोलनाची धग कमी-अधिक प्रमाणात २९ जुलै रोजी देखील कायम होती. नागपूर ते औरंगाबाद या द्रुतगती महामार्गावरील कुकसा फाटा येथे रविवारी सकाळी ९.३० ते १ वाजेदरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासन तातडीने हालचाली करीत नसल्याचे पाहून सकल मराठा समाजबांधवांनी बंदची हाक दिली आहे. तातडीने मराठा आरक्षण द्यावे, आरक्षणासाठी प्राणास मुकलेल्या तरुणास शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात २४ जुलैपासून कमी-अधिक प्रमाणात आंदोलन केले जात आहे. २९ जुलै रोजी औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती महामार्गावरील तथा मालेगाव तालुक्यातील कुकसा फाटा येथे सकाळी ९.३० वाजतादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मेहकर ते मालेगाव या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी  १ वाजतादरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात कुकसा, मांगूळझनक परिसरातील १० ते १५ गावातील सकल मराठा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, पोलीस कर्मचारी दामोधर, इप्पर, रतन बावस्कर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Maratha Reservation: Route-stop at Kukasa Phata in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.