Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा फाट्यावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:09 PM2018-08-08T12:09:55+5:302018-08-08T12:11:06+5:30
वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात विविध स्वरूपातील आंदोलने सुरू आहेत. त्याची धग वाशिम जिल्ह्यातही कायम असून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४ आॅगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. ६ आॅगस्टला वाशिममध्ये मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले; तर ७ आॅगस्ट रोजी आमदार, खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व भजन जागरणाच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न लावून धरला. तसेच ८ आॅगस्ट रोजी वाशिम-रिसोड मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक असंख्य समाजबांधवांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. पुढच्या टप्प्यात ९ आॅगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली असून त्यात वाशिम जिल्ह्यातील व्यापाºयांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.