मराठा सेवा संघाची कार्यशाळा उत्साहात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:23 AM2017-09-07T01:23:51+5:302017-09-07T01:23:59+5:30

वाशिम : स्थानिक केमीस्ट भवन येथे  ३ सप्टेंबरला मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. 

Maratha Seva Sangh workshop enthusiast! | मराठा सेवा संघाची कार्यशाळा उत्साहात!

मराठा सेवा संघाची कार्यशाळा उत्साहात!

Next
ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चापदाधिकार्‍यांच्या कार्यशाळेचा दुसरा टप्पा लवकरच!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक केमीस्ट भवन येथे  ३ सप्टेंबरला मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. 
कार्यशाळेचे मार्गदर्शक तथा सुलभक म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले तर उदघाटक म्हणून जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे हे होते. यावेळी व्यक्तीमत्व विकास, सृजणत्व निर्मिती,  मानवी जीवनाचे मूल्य व चिंतन, देहबोलीचा वापर, सकारात्मकता वाढवणे, बुद्धीप्रामाण्याला प्रमाण मानणे, वैज्ञानिक दृष्टीकोन, यासोबतच चळवळीची गरज, स्थापना, इतिहास, सद्यस्थिती, पदाधिकार्‍यांत अपेक्षीत व झालेले बदल, समाजासमोर मांडण्याची शैली, जिजाऊ सृष्टी, प्रगती व समाजाकडून अपेक्षा, महामानवांचे विचार व आत्मसात तथा आचरणाची आवश्यकता, समाजातील विविध समस्या व पदाधिकार्‍यांचा अभ्यास तथा अलिप्ततेचा परिणाम व अन्य विषयांवर  चर्चा करण्यात आली. समाजात वावरतांना एकांगी भूमिका न मांडता पूर्ण अभ्यास करूनच पदाधिकार्‍यांनी ती मांडली पाहिजे असे विचार या कार्यशाळेत मांडण्यात आले. कुणाचाही द्वेष न करता सर्वांगीन  प्रगतीची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांच्या कार्यशाळेचा दुसरा टप्पा लवकरच घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. कार्यशाळेत जिल्हाध्यक्ष प्रा. भरत आव्हाळे, सचिव नारायणराव काळबांडे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा प्रा. सविता मोरे, जिल्हाध्यक्षा संजीवनी बाजड, वैशाली बुंधे, सुरेखा आरू, वर्षा भगत, गोपालराव गावंडे, अनिल वाघ, अरुण झुंगरे,प्रभाकर लहाने, विकास नवघरे, अनिल मोरे, विजय बोरकर, दत्ता पोफळे,संजय पडोळे, डिगांबर सरकटे, धनंजयराव देशमुख, भागवत बुंधे, भागवत मापारी, नारायण शिंदे, विकास नवघरे, आदी पदाधिकारी व दिलीप शिंदे, कैलास मुठाळ, मनोज भोयर, शिवाजी कव्हर, गजानन वाझुळकर यांनी चर्चेत सहभाग नोंदवला. 

Web Title: Maratha Seva Sangh workshop enthusiast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.