उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:57+5:302021-03-01T04:48:57+5:30
काव्यवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तुरुकमाने होते. वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचा जणू शुक्रताराच होय. ज्ञानपीठ ...
काव्यवाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य तुरुकमाने होते. वि. वा. शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज हे मराठी साहित्याचा जणू शुक्रताराच होय. ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाले. मराठी भाषा ही अतिप्राचीन व वैभवशाली भाषा आहे. मराठी भाषेचा दरारा, प्रतिभा याला जगात तोंड नाही, असे विचार अध्यक्ष प्राचार्य तुरुकमाने यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. खेडेकर यांनी केले. या कार्यक्रमात दीपाली गरकळ, सोनाली बोरकर, शिवानी चौधरी, सुर्वेश थोरात, आदिनाथ ढोले, पूनम खरात, हमाने यांनी ऑनलाइन काव्यवाचन केले. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. सूत्रसंचालन सोनाली बोरकर हिने तर आभार प्रदर्शन दीपाली गरकळ हिने केले.