सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:54+5:302021-03-01T04:48:54+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संस्थापक प्रा.कमलाकर टेमधरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाचे प्रा.सिद्धार्थ इंगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संस्थापक प्रा.कमलाकर टेमधरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाचे प्रा.सिद्धार्थ इंगोले, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रवीण हाडे, प्रा. निखिल उंबरकर, रवि अंभोरे उपस्थित होते. प्रा. इंगोले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मत व्यक्त करताना मराठी भाषेचा इतिहास व सद्यस्थितीतील भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेचे वैभव वाढविले म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.
कुसुमाग्रजांप्रमाणे मराठी भाषेला वृद्धिंगत करण्यासाठी अनेक संत, नाटककार, शाहीर, गीतकार, संगीतकार, कवी यांचे कार्य आणि योगदान महत्त्वपूर्ण आहे. तीच परंपरा आजच्या पिढीने कायम ठेवून मराठी भाषेचा जागतिकस्तरावरील मानबिंदू कायम ठेवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत प्रा. इंगोले यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी कवी चाफेश्वर गांगवे यांनी कवितावाचन केले, प्रा.बी. एन. चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अतुल खोटे, प्रा. शालिकराम पठाडे, प्रा. शरद टेमधरे, बी. एच. आघाव, केशव इंगळे आदींसह मराठी साहित्यप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवि अंभोरे यांनी केले. डॉ. प्रवीण हाडे यांनी आभार मानले.