शेतकरी प्रश्नावर २१ मार्च राेजी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 AM2021-03-13T05:15:51+5:302021-03-13T05:15:51+5:30
मात्र शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मानाेरा तहसील कार्यालय ...
मात्र शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मानाेरा तहसील कार्यालय परिसरात २१ मार्च राेजी आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते देवराव राठाेड यांनी दिली.
बाजार समितीत शेतकऱ्यांकडून शेकडा २ टक्के आडत घेतल्या जाते. तुरीचे भाव ६,००० रुपये आहे तर एक क्विंटल तुरीवर १२० रु. आडत आणि २० रुपये इतर खर्च असे १४० रुपये घेतल्या जातात. ही आडत न कापता आडत म्हणून माल घेणारा व्यापारी दलालास शेकडा ५० पैसे प्रमाणे देईल असा राज्य सरकारचा निर्णय आहे. तर एका पोत्यावर दलालास ३० रुपये देतील,तरी ३००० रोज मिळेल.
मात्र वाशिम जिल्ह्यात शेलू बाजार, वाशिम, मालेगाव,
कारंजा या सहकारी बाजार समितीत आडत घेतली जात नाही. तर मानोरा येथील खासगी बाजारात आडत न कापता नगद पैसे दिले जाते.
मात्र मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतच आडत का घेतली जाते असा सवाल शेतकरी नेते देवराव राठोड यांनी केला.
याकडे जिल्हा उपनिबंधक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. कर्जमाफी बाबत असेच आहे . मार्च महिना संपायला आला, राज्य सरकारने कर्जमाफी केली आहे. मात्र रोजंदारीवरील सोसायटी सचिव यांनी चुकीची माहिती पुरविल्याने अनेक शेतकऱ्याची कर्ज प्रकरणे जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांकडून लेखी हमी न घेता परस्पर अर्ज लिहून पुनर्गठन केले . कर्जमाफीत कमी हप्ते टाकून कर्ज रक्कम कमी दाखविली आहे. काही शेतकऱ्यांना कर्ज काढल्याचे ही माहीत नाही. कर्जमाफी २ लाख पर्यंत आहे तर मुद्दल व्याज दोन लाखाला का नाही शासन आदेशाप्रमाणे कर्जमाफी धोरण योग्य आहे. मात्र सोसायटी सचिव व शेतकरी यांना मानसिक त्रास देत आहे, असा आरोप राठोड यांनी केला.
भाजीपाला पीक आडत सुद्धा बंद केली पाहिजे. अशी मागणी मानोरा -कारंजा शेतकरी संघर्ष समितीचे देवराव राठोड यांनी केली आहे. याकरिता मानोरा तहसील कार्यालयावर २१ मार्च आंदोलन केले जाईल. तरी शेतकरी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन
कारंजा - मानोरा शेतकरी
संघर्ष समितीचे देवराव राठोड कारखेडकर, गजानन राठोड, डॉ. संजय रोठे, प्रा.जय चव्हाण , मनोज खडसे, विवेक ठाकरे, मुंगसिराम उपाधे, भानुदास जाधव यांनी केले आहे.