घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:33+5:302021-05-07T04:43:33+5:30

वाशिम : राज्यात संचारबंदीची घोषणा करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा करून २० दिवसांचा कालावधी ...

The market for announcements; The peddlers did not even fall into the hands! | घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही !

घोषणांचाच बाजार; फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही !

Next

वाशिम : राज्यात संचारबंदीची घोषणा करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा करून २० दिवसांचा कालावधी उलटला आहे. तथापि, जिल्ह्यातील फेरीवाल्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून नगर परिषदांना कोणत्याही मार्गदर्शक सूचनाही अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. रिसोड शहरातील ८०० आणि वाशिम शहरातील ११०० अशा एकूण १९०० फेरीवाल्यांना दीड हजाराची प्रतीक्षा कायम आहे.

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली. मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, फेरीवाले आदींना थोडाफार दिलासा म्हणून नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणाही केली होती. रिसोड नगर परिषदेंतर्गत ८०० फेरीवाल्यांची नोंद आहे. वाशिम नगर परिषदेंतर्गत फेरीवाल्यांची नोंद नाही; मात्र यापूर्वी केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी जाहिर केलेले अर्थसहाय्य देण्यासाठी ११०० फेरीवाल्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले होते. यानुसार या फेरीवाल्यांना तेव्हा मदत मिळाली होती. याच धरतीवर राज्य शासनाकडून मदत मिळणार आहे. आज ना उद्या १५०० रुपये मिळतील, या अपेक्षेवर असलेल्या फेरीवाल्यांच्या आता भ्रमनिरास होत आहे. बँक खात्यात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा केव्हा होणार? याकडे फेरीवाल्यांचे लक्ष लागून आहे.

0000

कोट बॉक्स

लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर बिकट आर्थिक प्रश्न निर्माण होत आहे. सरकारने जाहिर केलेल्या मदतीचा थोडाफार दिलासा मिळू शकेल.अशी अपेक्षा होती. परंतू, अद्याप मदत मिळालेली नाही. मदत केव्हा मिळणार याची प्रतीक्षा आहे.

- अ. हबीब अ. कय्यूम

00

मिनी लॉकडाऊन असल्याने रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. दीड हजार रुपये जाहिर केले. मात्र, ही रक्कम अजून मिळालेली नाही. रक्कम मिळणार की नाही यबाबतही आता शंका उपस्थित होत आहे. दीड हजार रुपये दिले तर फेरीवाल्यांनो थोडाफार दिलासा मिळू शकेल.

- शुभम कांबळे

००००

फेरीवाल्यांना दीड हजार रुपयाची प्रतीक्षा आहे. नगर परिषदेकडे जाऊन चौकशी केली असता, अजून काहीच सूचना आलेल्या नाहीत, असे सांगितले जात आहे. दीड हजार रुपये लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी आहे.

- इमरान खॉ,

.....

००००

रिसोड शहरात ८०० फेरीवाल्यांची नोंद आहे. या फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून अद्याप मार्गदर्शक सूचना प्राप्त नाहीत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

- गणेश पांडे,

मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड

००००

००००

जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले

१९००

००

नोंदणी नसलेल्यांची संख्या

४१५०

00

Web Title: The market for announcements; The peddlers did not even fall into the hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.