बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:38 PM2019-06-05T14:38:20+5:302019-06-05T14:39:12+5:30
वाशिम : पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश बाजार समित्यांमधील ओट्यांखाली शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवला जातो.
वाशिम : पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश बाजार समित्यांमधील ओट्यांखाली शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवला जातो. आता पावसाळा तोंडावर आल्याने शेतकºयांचा शेतमाल ओट्यावर ठेवण्याचे नियोजन बाजार समिती प्रशासनाकडून होणे अपेक्षीत आहे. तथापि, कोणतेही नियोजन नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतमाल भिजण्याची भीती शेतकºयांमधून वर्तविली जात आहे. याची प्रचिती ३ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आली असून, मान्सूनपूर्व पावसाने शेतमाल भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले.
शेतकºयांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, शेतमाल विक्रीनंतर शेतकºयांची फसगत होऊ नये आणि बाजारपेठेत हमीभावानुसार शेतमालाची खरेदी व्हावी या उद्देशाने बाजार समित्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक बाजार समितीत शेतमालाची हर्रासी करण्यासाठी तसेच शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यासाठी ओट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, पश्चिम वºहाडातील अनेक ठिकाणी या ओट्यांवर शेतकºयांऐवजी व्यापाºयांचाच शेतमाल अधिक प्रमाणात ठेवला जात असल्याने ओट्याखाली शेतकºयांचा शेतमाल ठेवण्याची वेळ आली आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे ओट्याखालील शेतमाल भिजून शेतकºयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान पावसाळ्याच्या दिवसात तरी ओट्यावर शेतकºयांचाच शेतमाल ठेवण्याचे नियोजन संबंधित बाजार समिती प्रशासनाने करणे आवश्यक ठरत आहे. ३ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने बाजार समितीमध्ये शेतकºयांची एकच धांदल उडाली होती. बाजार समितीमधील ओट्याखाली असलेला शेतकºयांचा शेतमाल भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करणे शेतकºयांना अपेक्षित आहे.
शेतकºयांचा शेतमाल बाजार समित्यांमधील ओट्यावरच ठेवण्यात यावा, अशा सूचना बाजार समिती प्रशासनाला यापूर्वीच दिलेल्या आहेत. याऊपरही कुणी सूचनांचे पालन न करता शेतकºयांच्या गैरसोयीचे धोरण अंगिकारत असेल तर चौकशी केली जाईल. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम