वाशिम जिल्ह्यात झेंड्यांचा बाजार अद्यापही गारच!
By admin | Published: September 17, 2014 01:13 AM2014-09-17T01:13:11+5:302014-09-17T01:13:11+5:30
प्रचार मोहीमा अद्याप सुस्त: झेंडे विक्रेते चिंतेत, प्रचाराची धूम वाढण्याकडे लक्ष
वाशिम : आगामी १५ ऑक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीने राजकीय वातावरण तापविले असले तरी, बाजारपेठ अद्यापही गारच असल्याचे दिसून येत आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीसह भारतीय जनता पक्ष- शिवसेना- रिपाइं- शिवसंग्राम- स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाच्या महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केले नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीची राजकीय होळी पेटलीच नाही. परिणामी, पाहीजे त्या प्रमाणात खुला प्रचार सुरु झालाच नसल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी आणलेल्या झेंडे, बॅनर, बॅचेसकडे राजकारण्यांची अद्याप पाठच असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी २७ सप्टेबर शेवटची तारिख आहे. त्यांनतर खर्या अर्थाने प्रचाराची धूम सुरू होणार आहे. सद्या प्रचार जोरात सुरू न झाल्यामुळे प्रचारासाठी आवश्यक असलेले झेंडै, बॅनर व इतर प्रचार साहित्याच्या दुकानात गर्दी दिसून येत नाही.