बाजारातील तुरीचे दर ५ हजारांवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:24 PM2018-12-24T16:24:28+5:302018-12-24T16:24:33+5:30

आता मात्र, तुरीच्या दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तथापि, शासनाच्या ५६७५ रुपये प्रति क्विंटलच्या तुलनते अद्यापही तुरीची कमी दरानेच खरेदी होत आहे.  

Market rate of toor reach 5 thousand rupees | बाजारातील तुरीचे दर ५ हजारांवर  

बाजारातील तुरीचे दर ५ हजारांवर  

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामातील तूर बाजारात विक्रीसाठी येत असतानाच गत आठवड्यात या शेतमालाच्या दरात मोठी घसरण सुरू झाली होती. आता मात्र, तुरीच्या दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तथापि, शासनाच्या ५६७५ रुपये प्रति क्विंटलच्या तुलनते अद्यापही तुरीची कमी दरानेच खरेदी होत आहे.  
वाशिम जिल्ह्यात यंदा  ६० हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. त्यात सर्वाधिक १३१८७ हेक्टर क्षेत्र वाशिम तालुक्यात, तर रिसोड तालुक्यात १३०८७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. इतर तालुक्यांच्या तुलनेत या दोन्ही तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यात रिसोडची स्थिती भीषण असल्याने या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळही घोषीत करण्यात आला. दरम्यान, मागील महिन्यापासून वातावरणात झालेल्या विपरित बदलाचा फटका तुरीला बसल्याने या पिकाच्या उत्पादनात मोठी घटही येत असल्याचे शेतकºयांच्या काढणीवरून दिसत आहे. आता यंदाच्या तुरीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर गत आठवड्यात तुरीचे दर ४६०० रुपये प्रति क्विंटलवर घसरले होते. गेल्या तीन दिवसांपासून मात्र तुरीच्या दरात तेजी आली असून, बाजार समित्यांत व्यापाºयांकडून या शेतमालाची खरेदी ५ हजार रुपये प्रति क्विंटल दराने करण्यात येत आहे. शासनाच्या हमीदरापेक्षा अद्यापही ६०० रुपये कमी दराने ही खरेदी होत असली तरी, येत्या काळात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Market rate of toor reach 5 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.