रिसोड, मालेगाव येथील बाजारपेठ गजबजली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:40 PM2020-06-05T16:40:07+5:302020-06-05T16:40:27+5:30
सर्वच व्यवसाय आठवडाभर सुरू झाल्याने रिसोड, मालेगावातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड/मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मागील दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठ ठप्प होती. मध्यंतरी वेळापत्रकानुसार आणि आता सर्वच व्यवसाय आठवडाभर सुरू झाल्याने रिसोड, मालेगावातील जनजीवन पूर्वपदाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने मे महिन्यापासून अत्यावश्यक सेवेसह काही व्यवसाय सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली. ३० जूनपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात स्थानिकस्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने जिल्हा प्रशासनाने हॉटेल्स, मॉल वगळता सर्वच व्यवसाय सकाळी ९ ते ५ या वेळात सुरू करण्यास मुभा दिली. त्यामुळे मालेगाव येथील बाजारपेठेत जूनच्या १ तारखेपासून विविध वस्तू, साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढली असून जनजीवन पूर्वपदावर वाटचाल करीत आहे. रिसोड येथील बाजारपेठेतही नागरिकांची वर्दळ दिसून येते. खरिप हंगाम तोंडावर असल्याने कृषी सेवा केंद्र व शेतीपयोगी साहित्याच्या दुकानांवर शेतकºयांची वर्दळ वाढली आहे. रिसोड व मालेगाव येथील बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून येते.
कॅ प्शन : मालेगाव तसेच रिसोड येथील बाजारपेठेत झालेली गर्दी