ग्रामीण भागांतील बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:08+5:302021-08-25T04:46:08+5:30
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने नवीन नियम शिथिल केले असले तरी वातावरणात बदल झाल्याने सायंकाळी ५ पूर्वीच अत्यावश्यक ...
वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने नवीन नियम शिथिल केले असले तरी वातावरणात बदल झाल्याने सायंकाळी ५ पूर्वीच अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्यत्र सर्व दुकाने बंद असल्याने ग्रामीण भागांतील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.
-----------------
ग्रामीण भागांत अनियमित वीजपुरवठा
वाशिम : कोेरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून, विविध व्यवसाय आता रुळावर येत आहेत. तथापि, ग्रामीण भागांतील खंडाळा, देपूळ, दगड उमरासह इतर काही भागांत सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे लघु व्यावसायिक हैराण झाले आहेत.
--------------
नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कारवाई
वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. विविध मार्गांवर चारचाकी, दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत जागमाथा फाट्यावर सोमवारी ७ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
------
पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या वाऱ्या
वाशिम : राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकरी वारंवार पीककर्जासाठी बँकांच्या वाऱ्या करीत असल्याचे चित्र मानोरा येथे सोमवारी पाहायला मिळाले.
--------------------
ग्रामीण भागांत स्वच्छतेबाबत जनजागृती
वाशिम : जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारासह हिवताप आणि इतर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत सोमवारी गावागावात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करून ग्रामस्थांनाही पाणी साठविण्याच्या टाक्या, माठांत औषधी टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
---------