बाजारपेठ कडकडीत बंद; संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 11:59 AM2021-03-07T11:59:10+5:302021-03-07T11:59:29+5:30

Curfew in Washim जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

Market tightly closed; Washimkar's response to the curfew | बाजारपेठ कडकडीत बंद; संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद 

बाजारपेठ कडकडीत बंद; संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद 

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीला रविवारी दिवसभर वाशिमकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीच्या आदेशाला ८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडीकल्स, दुग्धविक्रेते/डेअरी, प्रवाशी वाहतूक व आॅटो वाहतूक आदींना वगळण्यात आले. शनिवार, ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवार, ७ मार्च रोजी दिवसभर जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, प्रवाशी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवासही सुसाट असल्याचे पाहावयास मिळाले.
 
प्रमुख शहरांमध्ये शुकशुकाट
संचारबंदी आदेशाचे पालन म्हणून वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर या प्रमुख शहरांसह शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, कामरगाव, धनज, शेंदुरजना अढाव, मेडशी, रिठद आदी गावांमधील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला.

Web Title: Market tightly closed; Washimkar's response to the curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम