विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

By admin | Published: April 11, 2017 02:12 AM2017-04-11T02:12:16+5:302017-04-11T02:12:16+5:30

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासूसह पाच जणांवर सोमवारी गुन्हा दाखल केला.

Marriage of persecution; Five offenders | विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा

Next

मालेगाव : माहेरहून ५0 हजार रुपये आणण्याकरिता तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासूसह पाच जणांवर सोमवारी गुन्हा दाखल केला. यासंदर्भात प्रियंका खंडारे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले, की ५ जून २0१४ रोजी आपला विवाह विरू ऊर्फ बबलू खंडारे यांच्यासोबत झाला. प्रारंभीचे सहा महिने सुरळीत गेल्यानंतर पती बबलू, सासू रमाबाई विजय खंडारे, ननंद वर्षा सुतार, ज्योती डोंगरे व चंद्रकांत नारायण पाटील यांनी संगनमत करून माहेरहून ५0 हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावून मानसिक छळ केला. त्यावरून पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम ४९८(अ), ३२३, ५0४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Marriage of persecution; Five offenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.