नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:58 AM2017-10-07T01:58:56+5:302017-10-07T01:59:22+5:30
मानोरा: तालुक्यातील पोहरादेवी येथील विवाहित महिलेसोबत फेसबुक, व्हॉट्स अँपच्या माध्यमातून जवळीक साधून तिला नोकरीचे आमिष दाखवत यवतमाळ, पुणे येथे नेऊन अत्याचार केला, तसेच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकल्याची तक्रार मानोरा पोलिसांत शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी पीडित महिलेने दिली. या प्रकरणी पोलिसांनी पंढरपूर येथील आरोपी रु पेश राजकुमार संत याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार पंढरपूर जिल्ह्यातील विळलनगर येथील रहिवासी असलेला आरोपी रुपेश राजकुमार संत याने मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील महिलेशी तिचे फेसबुक अकाउंट, तसेच व्हॉट्स अँपच्या माध्यमातून मॅसेजेसद्वारे तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मैत्रीचे नाते जोडले आणि तुला पुण्याला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत तिला यवतमाळ येथे गॅनसन लॉजवर नेले आणि तिच्यावर जबरी अत्याचार केला.
त्यानंतर पुणे येथे नेऊन वेगवेगळय़ा ठिकाणी शारीरिक शोषण केले. या दरम्यान आरोपीने सदर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने विकले आणि सदर महिलेच्या भावाशी भ्रमणध्वनीवर सं पर्क साधून एक लाख रुपयांची मागणी केली, तसेच त्या मागणीची पूर्तता न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित महिलेने दिली. यावरून मानोरा पोलिसांनी कलम ३६३, ३७६, ३८४, ५0६ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून आरोपी राजकुमार संत याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकाडे करीत आहेत.