मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:27+5:302021-06-09T04:50:27+5:30
शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ...
शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील मोफत प्रवेशाच्या ९६ हजार ६८४ जागांसाठी दोन लाख २२ हजार ५८४ अजार्तून ८२ हजार १२९ बालकांची निवड झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ७१८ जागा राखीव आहेत. यासाठी प्राप्त १११९ अर्जांतून ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे प्रवेशप्रक्रिया ठप्प होती. आता अनलॉक झाल्याने मोफत प्रवेश प्रक्रियाही लवकरच निकाली निघणार आहे. दरम्यान, बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकडे पालक वळले आहेत. यंदाही तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे न जाता शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर होण्याची वाट न बघता आतापासूनच कागदपत्रे तयार ठेवण्याकडे पालकांचा कल असल्याचे दिसून येते.
०००
कोट बॉक्स
अनलॉकच्या टप्प्यात लवकरच मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याचे संकेत आहे. पालकांना शाळास्तरावरच पडताळणीसाठी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मोबाइलवर संदेश प्राप्त झाल्यानंतर बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित शाळेत पडताळणीसाठी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम