समृध्द गाव स्पर्धेंतर्गंत विहीर पाणी पातळी माेजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:43+5:302021-03-28T04:38:43+5:30

समृद्ध गाव स्पर्धेमधील मिनी स्पर्धेनंतर गावकरी विहिर पाणी पातळी मोजमाप टप्पा २ची मोजमापे घेत आहेत. स्पर्धेमधील सायखेडा व पारवा ...

Measurement of well water level under Samrudh Gaon competition | समृध्द गाव स्पर्धेंतर्गंत विहीर पाणी पातळी माेजमाप

समृध्द गाव स्पर्धेंतर्गंत विहीर पाणी पातळी माेजमाप

Next

समृद्ध गाव स्पर्धेमधील मिनी स्पर्धेनंतर गावकरी विहिर पाणी पातळी मोजमाप टप्पा २ची मोजमापे घेत आहेत. स्पर्धेमधील सायखेडा व पारवा या गावांमध्ये आज विहीर पाणी पातळी मोजमाप घेण्यात आले. त्याचबरोबर सायखेडा या गावाला मीनी स्पर्धेत १०८ गुण मिळाले आहेत, त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्याबद्द्लच्या कामाचे नियोजन आज करण्यात आले. त्याकरिता आज ग्रामसेविका बेलखेडे, तलाठी शिंदे, माजी सरपंच देवमन गहुले, उपसरपंच दिगंबर काळे, रोजगार सेवक गजानन गहुले व ग्रा.पं. कर्मचारी सुनील भगत यांच्यासोबत चर्चा करण्यात आली व राहिलेली कामे करण्यास आज सुरुवात करण्यात आली. तसेच पारवा येथील पाणी पातळीही घेण्यात आली. त्याकरिता ग्रा.पं. कर्मचारी राजुभाऊ लुंगे, विष्णूभाऊ सावके व संगणक परिचालक उमेश उपस्थित होते.

....................

माती नमुने जमा करण्याच्या सूचना

समृध्द गाव स्पर्धेतील गावातील माती नमुने गावातील प्रमुख ठिकाणी किंवा ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात यावेत, अशा सूचना सर्व कृषी सहायक यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव ताेटावार यांनी दिल्या आहेत. तसेच माती नमुने कसे घ्यावेत याबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही केले.

Web Title: Measurement of well water level under Samrudh Gaon competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.