साथरोग नियंत्रणासाठी मेडशी ग्रामपंचायतची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:45 AM2021-08-28T04:45:39+5:302021-08-28T04:45:39+5:30
सध्या जिल्हाभरात विषाणूजन्य ताप, डेंग्यूसदृश आजार, ताप, सर्दी, खोकल्यासह हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गावागावात या आजारांचे ...
सध्या जिल्हाभरात विषाणूजन्य ताप, डेंग्यूसदृश आजार, ताप, सर्दी, खोकल्यासह हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गावागावात या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. मेडशीतही या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गावात पसरत असलेल्या आजारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत ग्रामपंचायत सरपंच शेख जमीर शेख गनीभाई व ग्रामपंचायत सदस्यांनी गावात धूर फवारणी करण्याचा ठराव एकमताने पारित केला आणि या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू केली आहे. ग्रामस्थांचे आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतने योग्य उपाययोजना सुरू केल्या असून, फवारणी व डासांचा प्रादुर्भाव होत असलेल्या ठिकाणी डासनाशक औषध टाकण्यास सुरुवात केली आहे.
०००००००००००००००००००००००००
कोट: गावातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्याच्या दृष्टीने जीवन ड्रॉपचे औषधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे, त्याच बरोबर डासांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी डासनाशक सेंट्री औषध टाकण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
-शेख जमीर शेख गनीभाई,
सरपंच, मेडशी