वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वादात शवविच्छेदन खोळंबले; मालेगाव येथील गंभीर प्रकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:21 AM2018-02-05T01:21:10+5:302018-02-05T01:23:18+5:30

मालेगाव: तालुक्यातील वाघळूद येथील शेतकरी किसन मस्के (वय ५५) यांनी रविवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी सकाळी ११.३0 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविला; मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदनासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे कारण समोर करून शवविच्छेदनास तब्बल ४ तास विलंब लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.

Medical officers quizzed for autopsy; The serious type of Malegaon! | वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वादात शवविच्छेदन खोळंबले; मालेगाव येथील गंभीर प्रकार!

वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वादात शवविच्छेदन खोळंबले; मालेगाव येथील गंभीर प्रकार!

Next
ठळक मुद्देमृतदेहाची अवहेलना 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तालुक्यातील वाघळूद येथील शेतकरी किसन मस्के (वय ५५) यांनी रविवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी सकाळी ११.३0 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविला; मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदनासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे कारण समोर करून शवविच्छेदनास तब्बल ४ तास विलंब लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय नसल्याने पोलिसांनी किसन मस्के यांचा मृतदेह विनाविलंब मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेला. घटनेचे गांभीर्य ओळखून तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप वाढवे यांनी शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते; मात्र मृतदेहासोबत शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. करवते यांनी स्वत: येऊन शवविच्छेदन करायला हवे, अशी भूमिका घेऊन शवविच्छेदन थांबविण्यात आले, अशी माहिती डॉ. करवते यांनी दिली; मात्र याप्रकरणी डॉ. वाढवे यांच्याशी संपर्क साधला असता, स्वीपर हजर नसल्यानेच शवविच्छेदनास विलंब लागल्याचे ते म्हणाले. 
एकूणच केवळ दोन वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अंतर्गत वादामुळे मृतक शेतकर्‍याच्या शवविच्छेनास मात्र तब्बल ४ तास विलंब लागला. या गंभीर प्रकार प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Medical officers quizzed for autopsy; The serious type of Malegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.