वैद्यकीय देयकाचा प्रश्न निकाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 04:57 PM2020-11-06T16:57:37+5:302020-11-06T16:57:45+5:30
शिक्षण सभापतींच्या दालनात झालेल्या या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चट्टोपाध्याय, निवडश्रेणी तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाचे प्रश्न महिनाभरात निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण विभागाने शिक्षक संघटनांना गुरूवारी दिले. शिक्षण सभापतींच्या दालनात झालेल्या या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची उपस्थिती होती.
शिक्षण, शिक्षकांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात शिक्षक कृती समितीने यापूर्वी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांच्या दालनात शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. यावेळी चट्टोपाध्याय /निवडश्रेणीचे सर्व प्रस्ताव ३० नोव्हेंबरपूर्वी निकाली काढण्यात येतील, निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण अट रद्द करुन २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना लागु केली जाणार असून, यासंदर्भात स्वतंत्र पत्र निघणार काढण्यात येईल, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकास विलंब लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल, मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघाल्यानंतर मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांची पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्यात येईल, वस्तीशाळा शिक्षकांना कायम करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच संबंधिताना आदेश निर्गमित होतील, असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले. यावेळी शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. विहित मुदतीत प्रश्न निकाली निघाले नाही तर आंदोलन छेडण्याचा येईल, असा इशारा यावेळी शिक्षक कृती समितीने दिला.