ऑनलाईन पद्धतीने मेडशीची ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:45 AM2021-08-28T04:45:46+5:302021-08-28T04:45:46+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची ग्रामसभा कित्येक महिन्यांपासून घेण्यात आली नव्हती. यापूर्वीची सभा ३ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आली ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची ग्रामसभा कित्येक महिन्यांपासून घेण्यात आली नव्हती. यापूर्वीची सभा ३ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आली होती. ग्रामसभेअभावी विविध कामे रखडली असतांना विकासात्मक कामांना गती देण्यासाठी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे शासनाने आदेश दिले. त्याअनुषंगाने २२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऑनलाईन ग्रामसभेबाबत ग्रामस्थ उदासीन असल्याने कोरमअभावी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला ग्रामसेवक मोहन वानखडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सभेमध्ये मागील वर्षाच्या जमा - खर्चाबाबत मान्यता घेण्यात आली. कर वसुली १०० टक्के करणे, १५व्या वित्त आयोगाबाबत माहिती देणे, ५ टक्के दिव्यांग आणि १५ टक्के मागासवर्गीय, कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी होणे, नरेगाअंतर्गत समृद्ध बजेट तयार करणे, आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम राबविण्याबाबत ठराव घेण्यात आले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्याबाबत सरपंच शेख जमीरभाई यांनी समाधानकारक उत्तरे देऊन प्रोसिडिंग बुकमध्ये नोंद केली.