वीज देयक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:08+5:302021-02-06T05:17:08+5:30
स्थानिक विठ्ठलवाडी मंगल कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी आयोजित अधिकारी, कामगार परिसंवाद, तांत्रिक कामगार वीज बिल वसुली मार्गदर्शन मेळाव्यात ते ...
स्थानिक विठ्ठलवाडी मंगल कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी आयोजित अधिकारी, कामगार परिसंवाद, तांत्रिक कामगार वीज बिल वसुली मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बारई होते. बुलडाणा लेखा विभागाचे व्यवस्थापक विकास बल्लाळ, वाशिमचे अधीक्षक अभियंता एस. एस. किन्नूर, कार्यकारी अभियंता विजय मानकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. के.चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. वीज देयक वसुलीचे ध्येय गाठणे, कृषी पंप जोडणी धोरण २०२० बाबत जनजागृती करणे, वीज गळती कमी करणे, वीज चोरीबाबत उपाययोजना, काम करीत असताना तांत्रिक कामगारांना येणाऱ्या विविध अडचणी आदींबाबत यावेळी ऊहापोह झाला.
यावेळी चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चांदेकर, मंडळाचे व्यवस्थापक कुणाल गजभिये यांच्यासह कामगार कल्याण मंडळाचे विश्वस्त रवींद्र वैद्य, कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने, किशोर फाले, ज्ञानेश्वर बिहाडे, आर. के. सावसाकडे, मनोज भोयर, विक्रमसिंह तोमर, झोन सचिव गणेश गंगावणे, पारस निर्मिती झोन पदाधिकारी चवरे, माजी झोन अध्यक्ष पी. जी. राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर लहाने यांनी केले. प्रास्ताविक गणेश गंगावणे यांनी केले, तर शेख अनवर यांनी आभार मानले.