आराेग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:10+5:302021-02-21T05:18:10+5:30
शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमित हजर नसतात. योग्य प्रमाणात कर्मचारीही उपस्थित राहत नाहीत. कर्मचारी अपडाऊन , ड्युटी बोर्ड ...
शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमित हजर नसतात. योग्य प्रमाणात कर्मचारीही उपस्थित राहत नाहीत. कर्मचारी अपडाऊन , ड्युटी बोर्ड नाही , रुग्णांना लहानसहान गोष्टीसाठी वाशिम रेफर करणे अशा बऱ्याच तक्रारी गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन उपाध्यक्षांनी शनिवारी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये रुग्ण सेवेचा सुधारण्याच्या सूचना दिल्या. इमारतीत स्वच्छता ठेवावी. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावे. लेट लतीफ मान्य केल्या जाणार नाही. इमारत आवारातील खासगी वाहनांची पार्किंग बंद करावी अशा सूचना दिल्या. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी सुद्धा उपाध्यक्ष गाभणे यांनी जाणून घेतल्या. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी,चार आरोग्य सेविका,एक आरोग्य सहाय्यक, एक फार्मासिस्ट उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. तसेच इमारत व परिसराच्या स्वच्छतेसाठी झाडू, पोच्छा, असिड, फिनोईलचा पुरवठा कित्येक दिवसापासून नाही. अशा समस्या उपाध्यक्ष समोर मांडल्या. उपाध्यक्षांनी शक्य तितक्या लवकर समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. या बैठकीला शुक्रवारी रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.