कारंजा तालुका 'सुजलाम सुफलाम' समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:55 PM2018-12-04T14:55:36+5:302018-12-04T14:55:51+5:30
कारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत कारंजा तालुका कमेटीची बैठक तहसिलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत जलसंधारणाच्या कामाबाबत चर्चा करून कामांना मंजुरात देण्यात आली.
ग्राम मोखड येथे कृषी विभागाअतंर्गत सुरू असलेल्या डिप सिसिटी कामाचे मोजमाप करून एम.बी. रेकॉर्ड करण्यात आल्याची माहीती बेलखेडे यांनी दिली. खतनापुर येथील वन विभागाअंतर्गत पुर्ण झालेल्या सीसीटीच्या कामाची मोजमाप घेउन एम.बी.रेकॉर्ड तयार करण्यात येणार असल्याची माहीती वन अधिकारी डोंगरे यांनी दिली. तसेच काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात चर्चा झाली. आठवड्यात ग्राम मोखड येथील डिपसिसिटीचे काम पुर्ण होणार आहे. त्यानुसार जे.सी.पी. व पोकलंड मशीन कामाचे नियोजन करण्यात आले.वनविभागाअंतर्गत ग्राम पिंपळगाव येथे २५ हेक्टरवर सि.सि.टी, काकडशिवनी येथे वन विभागाचे वनतळे व जिल्हा परिषद विभागाचे नालाखोलीकरण, चांदई व शेमलाई येथे जलसंधारण विभागाचे नालाखोलीकरण, अनई येथे कृषी व जि.प.विभागाचे नालाखोलीकरण, महागाव व वहीतखेड येथे ३८ हेक्टरवर कृषी विभागाची डिपसिसिटी तसेच अझमपुर येथे जलसंधारण विभागाचे नालाखोलीकरण व खानापुर येथे जिल्हा परिषद विभागाचे नालाखोलीकरण करण्यात येणार असल्याचे सवार्नुमते ठरविण्यात आले. वरील प्रमाणे ९ गावात जे.सी.पी व पोकलेड ने होणाºया कामाबाबत चर्चा व नियोजन करून वरील कामास या बैठकीत मजुंरात देण्यात आली. काम चांगल्या प्रकारे असल्याने कृषी व वन विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांचे तहसिलदार यांनी कौतूक केले. या बैठकीला तहसिलदार रणजीत भोसले, वनपरीक्षेत्र अधिकारी डोंगरे साहेब, गटविकास अधिकारी के.आर.तापी, जलसंधारण विभागाचे अमोल पाटील जिल्हा परीषद विभागाचे शेख सईद, कृषी पर्यक्षेक व्हि.आर.संघई, एस.बी.बेलखेडे, कृषी सहायक आर.एम.मार्गे, बिजीएसचे अक्षय सेलसुरकर व बानगांवकर याची उपस्थित होती.