कडक निर्बंधाबाबत शेलूबाजार येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:36+5:302021-05-11T04:43:36+5:30
कडक निर्बंधादरम्यान नागरिकांनी आरोग्य व आवश्यक सेवेव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये तसेच व्यापाऱ्यांनीसुध्दा आपली आस्थापने उघडू नयेत, अत्यावश्यक सेवेतील ...
कडक निर्बंधादरम्यान नागरिकांनी आरोग्य व आवश्यक सेवेव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये तसेच व्यापाऱ्यांनीसुध्दा आपली आस्थापने उघडू नयेत, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते १० पर्यंत घरपोच पार्सल सेवा सुरु राहील, पण दुकाने उघडून विक्री करता येणार नाही, असे जगदाळे यांनी सांगितले. दुकानासमोर गर्दी होता कामा नये. सदर दुकानात ग्राहक आढळून आल्यास स्थानिक प्रशासन दंडात्मक कारवाई करतील. शेती उत्पादनाचे दुकाने पूर्णपणे बंद राहतील. यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशाचे वाचन करुन व्यापाऱ्यांना सर्व बाबी स्पष्ट करून दिल्या. प्रत्येक नागरिकांनी कोरोना संसर्गपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी बिट जमादार अनिरुद्ध भगत, गोपाल कव्हर, बाबाराव पवार, ग्राम पंचायत सदस्य जयकुमार गुप्ता, महावीर तोडरवाल, कैलास अग्रवाल, दिनेश सुर्वे, सतीश पवार, नवीन गाडगे, प्रणय अग्रवाल, पराग वाडेकर, पवन वाडेकर, सुनिल हरणे, संजय हापसे, विशाल गावंडे, मुनिर खान, विवेक बारड, धनंजय काळे, शाम पवार, मुरलीधर भोसले यांच्यासह बहुसंख्य व्यापारी उपस्थीत होते.