वाशिम जि.प.च्या स्थायी समितीची सभा
By admin | Published: April 2, 2017 02:17 AM2017-04-02T02:17:57+5:302017-04-02T02:17:57+5:30
सदस्यांनी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली.
वाशिम, दि. १- जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी पार पडली. या सभेत घरकूल, पाणीटंचाई यासह विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात शनिवारी पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. यावेळी काही घरकूल प्रस्ताव ऑफलान राहिल्याने लाभार्थींना अनुदान मिळाले नाही, हा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. रेतीघाट लिलाव न झाल्याचा फटका बांधकामांना बसत आहे, हा मुद्दाही चर्चेत आला. सदस्यांनी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली. सभेला जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, पानु जाधव, यमुना जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांच्यासह सदस्य,विभाग प्रमुख उपस्थित होते.